Sri Lanka Crisis : महागाईच्या फेऱ्यात अडकलेली सोन्याची लंका,संकटात सापडलेल्या श्रीलंकेला भारताची मदत
अभिजीत करंडे, एबीपी माझा | 12 Apr 2022 11:53 PM (IST)
Sri Lanka Crisis : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेचा पाय आणखी खोलात गेला आहे. श्रीलंकेने आज मोठी घोषणा केली. परदेशी कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याची कबुली श्रीलंकन सरकारने दिली. श्रीलंकेने स्वत: लाच डिफॉल्टर असल्याचे घोषित केले. देशाच्या अर्थ मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडून श्रीलंकेला बेलआउट पॅकेजची अपेक्षा होती. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे अखेर श्रीलंका सरकारने परदेशी कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे.