पंतप्रधानपदावरून Imran Khan लवकरच पायउतार होणार? Pakistan मध्ये विरोधकांचा जल्लोष
abp majha web team | 09 Apr 2022 11:14 PM (IST)

Lahore : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावाआधी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण त्यासाठी त्यांनी तीन अटी ठेवल्या आहेत. असं असलं तरी त्यांच्यासमोर अविश्वास ठरावाला सामोरं जाण्याशिवाय कोणताही मार्ग नसल्याचं सांगितलं जातंय.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. पण आपण शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहू असं ते म्हणाले होते. त्यामुळे शेवटपर्यंत काही ना काही मार्ग निघेल अशी आशा त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी आता नवीन राजकीय खेळी खेळली असून राजीनामा द्यायचं कबूल केलं आहे पण त्यासाठी तीन अटी असल्याचं स्पष्ट केलं आहे.