मान्सूनपूर्वी मुलांना इन्फ्लुएन्झाचं इंजेक्शन? कोरोनापासून लहान मुलांना सरकार कसं रोखणार?
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई Updated at: 24 May 2021 10:56 PM (IST)
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातल्यनंतर आता काही प्रमाणात रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र आजही रोज देशभरात सव्वादोन लाखांच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट अद्याप ओसरलं नसताना सरकार आणि प्रशासनाला तिसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवला जात असल्याने पालकही चिंतेत होते. मात्र तिसऱ्या लाटेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग मुलांना होईल असं वाटत नाही, असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. डॉ. गुलेरिया यांच्या दाव्यानंतर पालकांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.