Pune Metro किती सुखकर? किती वेगवान? मेट्रोमुळे पुण्यातील वाहनांची समस्या सुटणार?
abp majha web team | 08 Mar 2022 11:39 PM (IST)

पुण्यात दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन झालं. त्यामुळे पुणे शहरात मेट्रो सुरु झाल्यानं वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा महामेट्रोकडून करण्यात येतोय. आम्ही हाच दावा पडताळून पाहायचं ठरवल. त्यासाठी आमच्या एका प्रतिनिधीनं पुण्यातील गरवारे महाविद्यालयापासून वनाझ स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास केला.