Special Report : ऑक्सिजनची निर्मिती कशी केली जाते? विदर्भात ऑक्सिजन निर्मिती का रखडली?
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा Updated at: 27 Apr 2021 11:36 PM (IST)
बीड : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर आज परळीच्या थर्मल पावर प्लांट मधील युनिट क्र. 8 चा ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात शिफ्ट केला आहे. ज्याचे ऑनलाईन उद्घाटन आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. या प्लांटची हवेतून तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे.