पडळकर, चर्चा आणि इतिहास...नेहमी चर्चेत राहणं पडळकरांना कसं जमतं? कोण आहेत गोपीचंद पडळकर?
आफताब शेख, एबीपी माझा | 01 Jul 2021 11:58 PM (IST)
सोलापूर : सोलापुरात काल (30 जून) गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारा तरुण मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारांचा शोध सुरु असतानाच सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर पडळकर समर्थकांनी हल्ला केला आहे. दोन तरुणांनी हातात दगड घेऊन कार्यालयाची काच फोडण्याचा प्रयत्न केला तसेच यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील केली.