Handicapped Vaccination : दिव्यांगांनी कशी करावी लसीकरणासाठी नोंदणी? कसं होणार दिव्यांगांचं लसीकरण?
निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
13 May 2021 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण व्हायला हवं अस तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यासाठी केंद्र शासन आणि राज्यशासन प्रयत्न देखील करत आहेत. परंतु कोव्हिन अॅपवर नोंदणी करण्याच्या आवश्यकतेमुळे यापासून अंध आणि संपूर्णपणे विकलांग बांधव मात्र लसीकरणापासून दूर आहेत. याबाबत या नागरिकांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. लसीकरणासाठी गेल्यानंतर त्यांना काय उत्तरं ऐकावी लागत आहेत याचा आढावा घेणारा "एबीपी माझा"चा स्पेशल रिपोर्ट!