120 वर्षांपूर्वी लॉकडाऊन लावणारे शाहू महाराज! वैद्यकीय सुविधा नसताना प्लेगच्या साथीत कसं केलं होतं व्यवस्थापन?
विजय केसरकर, एबीपी माझा | 06 May 2021 10:59 PM (IST)
कोरोनानं देशात आणि जगात जी परिस्थिती करुन ठेवलीय तशाच पद्धतीचं संकट 1898-99 साली आलं होतं. आणि ती होती प्लेगची साथ. पटापटा नागरिकांचे जीव जात होते. पण अशा वेळी करवीर संस्थानात प्लेगचा फारसा शिरकाव झाला नाही. त्याचं कारण होतं राजर्षी शाहू महाराजांनी अवलंबलेलं व्यवस्थापन. आज जे आपण क्वॉरंटाईन किंवा विलगीकरण म्हणतो त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शाहू महाराजांनी 120 वर्षांपूर्वी केली होती. कोल्हापूर शहराला महाराजांनी जवळपास रिकामं केलं होतं. ग्रामीण भागातील नागरिकांना शेतात झोपट्या बांधून राहण्यास मदत केली. देशातील पहिलं प्लेगचं हॉस्पिटल याच कोल्हापुरात उभं राहिलं होतं.