मेहुल चोक्सीला डॉमिनिकात कसं पकडलं? हिऱ्यांच्या झगमगाटातून अंधाऱ्या कोठडीतला प्रवास..
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 30 May 2021 11:54 PM (IST)
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची 13500 कोटींची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरेबियन बेटावरुन फरार झाला होता. त्याला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याचा अटक झाल्यानंतरचा पहिला फोटो हाती लागला आहे. चोक्सीचा हा फोटो डोमिनिकातील तुरुंगातील असल्याचं समोर आलं आहे. हा फोटो एएनआयनं आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. या फोटोत चोक्सीचा एक डोळा खूप लाल दिसून येत आहे.