Mamata Banerjee : ममतांनी डाव्यांचा गड उध्वस्त करत कशी मिळवली सत्ता?तीन दशकांपासूनचं बंगालचं राजकारण
शिशुपाल कदम, एबीपी माझा | 29 Apr 2021 10:30 PM (IST)
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपनं आपली संपूर्ण ताकत पणाला लावली आहे. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार टीएमसीला बंगालमध्ये 152 ते 165 जागा मिळणार आहेत तर भाजपला 109 ते 121 जागा मिळतील तर काँग्रेस-लेफ्ट आघाडीच्या खात्यात 14 ते 25 जागा जाणार असल्याचा अंदाज आहे.