HSC Exam Paper Leak :बारावीचा पेपर फुटला? विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये Chemistry चा पेपर
abp majha web team | 14 Mar 2022 10:53 PM (IST)

गेल्या शनिवारी झालेला बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर मुंबईत फुटल्याचं उघड झालंय. मालाडमधील खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणी विले पार्ले पोलिसांनी अटक केली आहे. मुकेश यादव असा या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या खाजगी शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याआधीच केमिस्ट्रीचा पेपर दिला असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी या तीन विद्यार्थ्यांनी चौकशी सुद्धा पोलिसांनी केली आहे.