Special Report | देवासमोरच्या दिव्यामुळे संसार उध्वस्त, उंदरानं वात पळवल्याने घराला आग | सोलापूर
सुनील दिवाण, एबीपी माझा | 22 Dec 2020 09:10 PM (IST)

करमाळा तालुक्यातील आप्पा वायसे हे अतिशय धार्मिक कुटुंब, रोज चोवीस तास कुटुंबावर कृपा करणाऱ्या भक्तिभावाने परमेश्वरासमोर चोवीस तास दिवा तेवत ठेवण्याची श्रद्धा मात्र याच दिव्याने आज त्यांचा घात झाला आणि भर दुपारी संपूर्ण घरसंसाराची होळी झाली. दुपारी घरातील मंडळी शेतात काम करून घरात परत आली असताना एका कोपऱ्यात घर पेटले. घरात आप्पा वायसे त्यांची पत्नी वडील आणि दोन मुले होती. शेजारी ओरडत आल्यावर याना आग लागल्याचे समजले आणि सर्वांनी घराबाहेर धाव घेतली. आज सोमवार असल्याने वायसे पती पत्नीचा उपवास होता त्यामुळे ते उपवासाचे बनावट होते. सकाळी पूजा केल्यावर देव्हाऱ्यात असलेल्या दिव्याची वात उंदराने पळवली आणि घराला आग लागली.