Hit And Run Case : अल्पवयीन मुलाकडून 'हिट अँड रन', वडिलांचे फाजील लाड, जीव घेण्याचं लायसन्स? Special Report

Hit And Run Case : अल्पवयीन मुलाकडून 'हिट अँड रन', वडिलांचे फाजील लाड, जीव घेण्याचं लायसन्स? Special Report
आईवडील आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करणं अगदी स्वाभाविक आहे. आपल्या आयुष्यात न मिळालेली सुखं मुलांना नक्की मिळावी याकरताही ते प्रयत्न करणं अगदी अपेक्षित आहे, असं असलं तरीही जेव्हा एखादे वडील आपल्या मिसरुडही न फुटलेल्या मुलाच्या हाती गाडीच्या चाव्या देतात, तेव्हा ते एखाद्याला मारण्याचं लायसन्स देतात का? छत्रपती संभाजीनगरमधली घटना याच प्रश्नाला जन्म देतेय.
ही दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात....
ही दृश्य तुमच्या काळजाचा थरकाप उडवू शकतात
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील...
घटना आहे छत्रपती संभाजीनगरमधली...
मंगळवारी २७ मेच्या संध्याकाळी ५ वाजता
संभाजीनगरच्या उद्धवराव पाटील चौकाजवळ
या गाडीने समोरच्या स्कूटीला दिलेली धडक इतकी जोरदार होती की
गाडीच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला
आणि त्यानंतर पेट घेतला...
धक्कादायक बाब म्हणजे या गाडीचा चालक आता अल्पवयीन असल्याचं समोर आलंय...
'तो' कारचालक अल्पवयीन
-------------------------------------
शेख रिझवानच्या नावावर असलेली
MH 02 CL 9036 क्रमांकाची ही गाडी
त्याचा १०वीत शिकणारा १४ वर्षांचा मुलगा चालवत होता...
हिट अँड रन प्रकरण, माझाचे सवाल
------------------------------------------
अल्पवयीन मुलानं आई-वडिलांच्या परवानगीने गाडी नेली का?
अल्पवयीन चालवत असलेल्या गाडीत कोण कोण होते?
अल्पवयीन आणि गाडीतली अन्य मुले शुद्धीत होती का?
गाडी नेमकं कोण चालवत होतं?
अल्पवयीन मुलाने यापूर्वीही गाडी चालवली होती का?
या घटनेतील स्कूटीचालक गंभीर जखमी झालाय...
तर अल्पवयीन मुलगा चालवत असलेली गाडी जप्त करण्यात आली आहे...
मुलांवरच्या अतिप्रेमापोटी अनेक पालक
अल्पवयीन मुलांना गाडी शिकवतात...
हीच मुलं कधी पालकांच्या परवानगीनं किंवा नजर चुकवून
रस्त्यावर घेऊन जातात... आणि मग हे असे अपघात घडतात
भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी कायद्याचा धाक असणंही गरजेचं आहे...
कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर