Sangli Helper Dog : अवघ्या 4 महिन्यांच्या 'रॉकी'ची कमाल राखण करण्यासोबत करतो शेतीचीही कामं
कुलदीप माने, एबीपी माझा | 13 Jun 2021 09:43 PM (IST)
मालक बोले, तैसा रॉकी चाले! कुत्रा म्हटलं की आठवतो तो त्याचा प्रामाणिकपणा… गावाकडे घराची राखण करणं. मालकांशी इमान राखणं आणि गुरा ढोरांच्या बरोबर राहून त्यांचे रक्षण करणं, सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात हिंगणगाव बुद्रुक या गावात असाच 4 महिन्याचा एक कुत्रा आहे जो सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. रॉकी असे त्या कुत्र्याचे नाव असून हा कुत्रा त्या मालकाचा शब्द खालीच पडून देत नाही. शेतीच्या कामात ही रॉकी मागे नाहीए. ठिबक पाइप मालकांने रॉकीकडे दिला की रॉकी बरोबर एका रेषेत धावत शेवटच्या टोकापर्यंत ठिबक पाईप नेऊन सोडतो आणि पुन्हा पाईप नेण्यासाठी त्याच गतीनं रिटर्न पळत देखील येतोय!