Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

आता एक वेगळी बातमी... अनेकदा कोमात गेलेल्या एखाद्या रुग्णाला अनेक वर्षं लाईफ सपोर्टवर जिवंत ठेवण्याची वेळ येते... अपघातामुळे किंवा मानसिक धक्क्यामुळे असं होऊ शकतं... अशा वेळी रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्याची अन् कुटुंबीयांचीही सुटका होईल, असा विचारही अनेकदा मनात येतो... आतापर्यंत यावर उपाय नव्हता... पण सुप्रीम कोर्टानं दिलेल्या एका निर्णयामुळे परिस्थिती बदलू शकते... बघुयात हा स्पेशल रिपोर्ट...
हरिष गेली 13 वर्ष बेडला खिळून आहे...
त्याच्या आयुष्यातल्या एका अपघातानं त्याची ही अवस्था झालीय...
आणि गेली 13 वर्ष तो असंच आयुष्य जगतोय...
PTCहरिष सारखे आणखी अनेक रुग्ण आपल्या भारतात आहेत...
ज्यांचं आयुष्य जन्म-मृत्यूच्या व्यूहात असं अडकून पडलंय की तिथून बाहेर येण्याचा
कोणताच मार्ग शिल्लक नाही...
म्हणूनच इच्छा मरणाची मागणी पुढे आली...
अखेर पॅसिव युथेनेशिया अर्थात निष्क्रिय इच्छामरण या विषयावर सुप्रीम कोर्टानं आज एक महत्वाचा निर्णय दिलाय... ज्यामुळे हरिषची या अवस्थेतून सुटका होणारय...))
हरिष हा चंदीग़डच्या पंजाब विद्यापिठातून बीटेकचं शिक्षण घेत होता...
त्यावेळी 2013 मध्ये वसतीगृहाच्या चौथ्या मजल्यावरून तो खाली पडला
आणि त्याचं पूर्ण शरीर अर्धांगवायूनं ग्रासलं... तो कोमात गेला...
डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या मेंदूच्या नसाही पूर्णपणे सुकल्यात...
हरिष या आजारातून बाहेर येण्याची शक्यता नसल्याचंही डॉक्टरांनी घोषित केलंय...
मात्र गेली १३ वर्ष हरिष व्हेंटिलेटरवरच्या सपोर्ट सिस्टममुळे जिवंत आहे...