Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
हापूस म्हटलं की कोकण. कोकण म्हंटलं की हापूस घट्ट समीकरण बनलं आहे. कोकणी हापूसला जीआय मानांकन मिळाल्याने साऱ्या जगानेही ते मान्य केलं आहे. पण आता कोकणी हापूसला स्पर्धा करण्यासाठी गुजरातमधला वलसाड हापूस समोर येऊ पाहतोय. वलसाड हापूसला जीआय मानांकन मिळावं यासाठी अर्ज करण्यात आलाय. याला कोकणातल्या शेतकऱ्यांनी विरोध केलाय. ही लढाई दीर्घ काळ चालणार आहे. वलसाड हापूस मानांकन मिळालं तर त्याचा कोकणच्या हापूस वर काय परिणाम होणार? पाहुयात हा रिपोर्ट...
महाराष्ट्राचा हापूस खास काय आहे इतिहास? ते पाहुयात
- हापूस आंब्याचं मूळ नाव पोर्तुगीज जनरल अल्फान्सो दी आल्बुकर्कवरून
अल्फान्सो असं ठेवण्यात आलं
- १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात विशेषत: गोव्यात, कोकणात
आंब्याच्या जाती विकसित करण्याची पद्धत आणली
- अल्फान्सो नावाचा अपभ्रंश होऊन मराठी भाषेत तो 'हापूस' झाला
- रत्नागिरी हापूस तसंच देवगडचा हापूस आंबा प्रसिद्ध
- जांभा दगडाची जमीन, उष्ण-दमट हवामान, नजीकचा समुद्र यामुळे
आंब्याला विशेष चव येते, ज्यामुळे कोकणसारखा हापूस इतरत्र नाही
- फळांचा राजा अशी ओळख असलेला हापूस अमेरिका, जपान, युरोप
आणि मध्य पूर्वेच्या देशांमध्येही निर्यात होतो