Israel-Hamas War Updates: हमासनं तान्ह्या बाळाची हत्या करुन मृतदेह जाळले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइस्रायल आणि हमासमधील युद्धाचा आज सहावा दिवस आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीवर सतत बॉम्बहल्ले सुरू आहेत. आजच्या दिवसात गाझा पट्टीत १५०हून अधिक मृत्यू झाला, तर मृतांचा एकूण आकडा चौदाशेच्या पार गेला आहे. गाझा पट्टीतले अनेक भाग पूर्णपणे बेचिराख झालेत. इस्रायलनं अन्न, वीज आणि पाण्याचा पुरवठा बंद केल्यानं गाझा पट्टीतले २० लाख रहिवासी जेरीस आले आहेत. रुग्णालयांमध्येही वीज नसल्यानं उपचार करणं जवळपास अशक्य झालंय. दुसरी समस्या म्हणजे जखमी आणि मृतांची संख्या इतकी प्रचंड आहे, की जखमींना भरती करणं शक्य होत नाहीये, कारण खाटाच उपलब्ध नाहीयेत. हमासनं अपहरण करून गाझा पट्टीत नेलेल्या इस्रायली नागरिकांना सोडेपर्यंत अन्न, पाणी आणि विजेचा पुरवठा सुरू करणार नाही अशी अट इस्रायलनं घातली आहे. इराणनं हमासच्या बाजूनं बोलण्यास सुरुवात केली आहे, मात्र इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणला तंबी देण्यात आली आहे. युद्धात मध्ये पडलात तर तुमच्या तेल रिफायनरींवर हल्ले करू असा स्पष्ट इशारा अमेरिकेनं याआधीच दिला आहे.