Theft : सोनसाखळी, मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या, मे महिन्यात चेन स्नॅचिंग, चोरीचे 55 गुन्हे
एबीपी माझा वेब टीम | 10 Jul 2021 11:12 PM (IST)

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन साखळी चोरी आणि मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. या घटना फक्त चोरी पूरत्या मर्यादित नसून यामुळे नागरिकांना गंभीर दुखापतही होत आहे तर काही प्रकरणांमध्ये जीवही गमवावा लागलेला आहे. काही दिवसांपूर्वीच रिक्षातून जाणाऱ्या एका तरुणीचा फोन हिसकावल्याने तिचा तोल गेल्याने पडून मृत्यू झाला. या घटनेवरुन याचे गांभीर्य समजते.