गोव्यात सिनेमा-मालिकांचं चित्रीकरण बंद, आमदार विजय सरदेसाईंनी बंद पाडलं मराठी कार्यक्रमाचं चित्रीकरण
गणेश ठाकूर, एबीपी माझा | 06 May 2021 09:33 PM (IST)
मडगाव : देशभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच कैक राज्यांनी स्थानिक पातळीवर लॉकडाऊनचे निर्णय घेतले आहेत. काही भागांमध्ये सक्तीचा लॉकडाऊन लागू न करता निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. गोव्यातही असंच काहीसं चित्र आहे. गोव्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत असतानाही इथं लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही, उलटपक्षी निर्बंध आणखी कडक करत प्रवाशांची ये-जा आणि अनेक कार्यक्रमांचं चित्रीकरण इथं सुरु आहे.