Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report

सध्याच्या डिजिटल युगात एकदा रेकॉर्ड झालेल्या गोष्टी कधीच कायमच्या डीलिट होत नाहीत, असं म्हणतात. महाराष्ट्रात सध्या अशाच दोन ऑडिओ क्लिप्स अचानक व्हायरल होऊ लागल्यात. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमधील संवादाच्या या ऑडिओ क्लिप्स असल्याचं सांगितलं जातंय. मात्र यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात खळबळ उडालीय. नेमक्या या ऑडिओ क्लिप्स कुठल्या आहेत आणि त्या व्हायरल झाल्यामुळे कशी खळबळ उडालीय, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी हीच ती ऑडिओ क्लीप.
यात एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंचा उद्धार करणारा आवाज भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरींचा असल्याचं समजतंय.
तर त्यांच्या वक्तव्याला हुंकारानं प्रतिसाद देणारा आवाज महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांचा असल्याचं बोललं जातंय.
खडसेंमुळे गिरीश महाजनांची कशी बदनामी होतेय आणि रक्षा खडसेंचं मंत्रिपद काढून घेणं का गरजेचं आहे, याबाबतचा संवाद या क्लीपमध्ये आहे.
एबीपी माझा या क्लीपची पुष्टी करत नाही.