Suez Canal | अखेर सुएज कालव्यात अडकलेलं कार्गो शिप निघालं! Special Report
एबीपी माझा वेब टीम | 29 Mar 2021 11:05 PM (IST)

Suez Canal : इजिप्तच्या सुएज कालव्यात मागील सहा दिवसांपासून अडकलेलं विशाल कार्गो जहाज आज अखेल हललं आहे. 'EVERGREEN' नावाचं हे विशाल जहाज आज पुन्हा सुरु झालं. इन्च केप शिपिंग सर्व्हिसेसनं याबाबत माहिती दिली आहे. सुएज कालवा प्राधिकरणाने याआधी माहिती दिली होती की विशालकाय कंटेनर जहाजाला अंशत: बाहेर काढलं आहे. हे जहाज निघाल्यामुळं संपूर्ण जगाला दिलासा मिळाला आहे.