Pune : कोरोनानंतर मणक्याची बुरशी? पुण्यात 5 जणांच्या मणक्याला बुरशी संसर्ग? Special Report
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
14 Oct 2021 10:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या रुग्णांना आता पाठीच्या मणक्याला बुरशीचा संसर्ग होत असल्याच समोर आलय. पुण्यात अशा पाच रुग्णांची नोंद झालीय. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या पाठीला बुरशीचा संसर्ग झाल्याच दिसून आल्यावर डॉक्टरांनी त्यांची मेडिकल हिस्ट्री तपासली असता पाचही जणांना काही दिवसांपूर्वीच कोरोना झाल्याच समोर आलं. ज्या प्रकारच्या बुरशीचा संसर्ग या रुग्णांना झालाय ती बुरशी या आधी वेगवेगळ्या कारणांनी रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेल्या रुग्णांमध्ये आढळत होती. पण कोरोनाच्या रुग्णांमधे ती पहिल्यांदाच आढळलीय.