Lonar Lake Fish लोणारच्या खाऱ्या पाण्यात मासे नेमके आले कसे? जैवविविधतेला धोका? Special Report
abp majha web team | 02 Nov 2025 08:46 PM (IST)
बुलढाण्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरात (Lonar Lake) मासे आढळल्याने खळबळ उडाली आहे, ज्यामुळे येथील अद्वितीय जैवविविधतेला (Biodiversity) धोका निर्माण झाला आहे. 'या पाण्याचा pH 10.5 च्या जवळ असतो, पण आता तो धोक्यात आला आहे,' अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक आमदारांनी (MLA) या खाऱ्या पाण्यात मासे जगूच शकत नाहीत, असे विधान केले होते. मात्र, आता 'तिलापिया' (Tilapia) प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात दिसू लागल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अतिवृष्टी आणि अवैधपणे मिसळणारे सांडपाणी यामुळे सरोवराच्या पाण्याचा खारटपणा आणि अल्कलीधर्मी गुणधर्म बदलत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. यामुळे सरोवराच्या मूळ सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो आणि UNESCO जागतिक वारसा स्थळासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवरही परिणाम होऊ शकतो.