Niraj Rathod Fake Call Special Report : पैसे द्या, मंत्री व्हा! भाजपा आमदारांना फेक कॉल
abp majha web team | 17 May 2023 09:40 PM (IST)
Niraj Rathod Fake Call Special Report : पैसे द्या, मंत्री व्हा! भाजपा आमदारांना फेक कॉल
शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होईल हे कोणालाही माहीत नाही... मात्र लवकरच विस्तार होईल आणि त्यात तुम्हाला ही मंत्रिपद मिळेल असे स्वप्न आमदारांना दाखवून त्यांना लुबाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे... नीरज सिंह राठोड नावाच्या एका भामट्याने फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर गोवा आणि नागालँड मधील काही भाजप आमदारांना मंत्रीपदाचे स्वप्न दाखवत त्यांच्याकडे लाखो रुपयांची मागणी केल्याचे हे प्रकरण आहे.