Konkan Flood : महापुरानंतर रत्नागिरीतील शिरगाव भितीच्या छायेखाली, Shiragaonची सद्यस्थिती 'माझा'वर
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा | 03 Aug 2021 05:55 PM (IST)
सह्याद्रीच्या खोऱ्यातलं खेड तालुक्यातील शिरगाव... सध्या हे गाव दरडीच्या छायेखाली आहे. तिन्ही बाजूंनी डोंगर आणि त्यात वसलेली गाव.या गावाची लोकसंख्या 1400 आहे. शिवाय ही घरे डोंगराच्या पायथ्याशी आहेत. महाराष्ट्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सह्याद्रीचे तिन्ही डोंगर खाली ढासळू लागलेत. त्यामुळे या डोंगराची येणारी माती सरकून वस्तीत आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरणात झाले आहे.