Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
अमेरिकेतील एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ सुरु आहे. कुख्यात उद्योगपती आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित लाखो गोपनीय कागदपत्रं काल रात्री सार्वजनिक करण्यात आली.
या ‘एपस्टीन फाईल्स’मध्ये बिल गेट्स, बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन, प्रिन्स एन्ड्र्यू अशा मोठमोठ्या व्यक्तींचे फोटो काल समोर आले. अमेरिकेच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या एपस्टिन फाईल्समध्ये भारतातील काही लोकांची नावं असल्याचं सांगितलं जातंय. पाहूया हा रिपोर्ट.
एपस्टीन फाईल्समुळे फक्त अमेरिकेतच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये खळबळ उडालीय अमेरिकेच्या न्याय विभागाने १९ डिसेंबरला एपस्टाीन फाईल्समधली नवी माहिती, नवी कागद, नवे फोटो सार्वजनिक केले. ४ सेटमध्ये ३ लाख कागदपत्रे असल्याचं सांगण्यात येतंय, त्यातले १ लाखा पेक्षा जास्त कागदपत्र सार्वजनिक केले या स्कँडलसोबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नावही जोडलं गेलेलं असल्यामुळे ही माहिती सादर करताना भरपूर दबाव होता त्यामुळे Epstein Files Transparency Act या अमेरिकेच्या नवीन कायद्याअंतर्गत हे दस्तावेज प्रकाशित करण्यात आले.
या फाईल्समध्ये बिल गेट्स पाठोपाठ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे फोटो देखील उघड करण्यात आले आहेत. फोटोमध्ये विविध अल्पवयीन मुलींसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती दिसत आहेतया फाईल्समध्ये फोन कॉल रेकॉर्ड्स, ई-मेलमधील संवाद, फोटो, आर्थिक व्यवहार आणि साक्षीदारांच्या जबाबांचाही समावेश आहे. मात्र, अनेक कागदपत्रांमध्ये नावे आणि तपशील -रिडॅक्ट- म्हणजेच गोपनीय ठेवण्यात आले आहेत.
या फाईल्समध्ये केवळ नाव किंवा संपर्काचा उल्लेख असणे म्हणजे गुन्हा सिद्ध होतो असं नाही, असं अमेरिकेच्या न्याय विभागाने स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी जेफ्री एपस्टीन फाईल्सचे गौप्यस्फोट अमेरिकेतील सत्ताकेंद्रांना आणि यंत्रणांना हादरवणारा ठरतोय. पुढील टप्प्यात कोणती नवी नावे समोर येणार, आणि सत्य कितपत उघड होणार याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.