Election Prachar : मतदार कुणाचा वाजवणार बँड, कुणाचा विजय ग्रँड? Special Report

दारोदारी जाऊन पत्रकं वाटणं, बॅनर लावणं, रॅली आणि सभा घेणं..हा झाला प्रचाराचा जुना फंडा... सध्या जमाना जेन झीचा आहे... त्यामुळे उमेदवाकांना मोबाईलच्या माध्यमातून प्रचार करण्याशिवाय पर्याय नाही... आणि त्यातही तो प्रचार सुरेल असेल तर... सध्या चांदा ते बांदा सुरेल प्रचारासाठी कशी धडपड सुरू आहे, पाहुयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेचा हा स्पेशल रिपोर्ट
निवडणुकीच्या प्रचारासाठी फार कमी वेळ उरला आहे...
उमेदवारांकडून दारोदारी जाऊन प्रचार केला जाईल...
मोठमोठ्या नेत्यांच्या सभाही होतील..
मात्र हा झाला प्रचाराचा पारंपरिक फंडा...
मोबाईलच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांची धडपड सुरू आहे..
आणि त्यासाठी काही उमेदवारांनी हा सुरेल पर्याय निवडलाय..
लोकप्रिय चालीत प्रचाराचं गाण गुंफण्यासाठी गायकाला मोठी कसरत करावी लागते
झेन झी असो किंवा आजोबा आजी...
कोणत्याही वयोगटाचा साथीदार म्हणजे स्मार्ट फोन..
त्यामुळे या स्मार्ट फोनला केंद्रस्थानी ठेवून प्रचाराची रणनीती ठरवली जातेय
आता मतदाराला कोणत्या उमेदवाराची चाल आवडते आणि मतांच्या रूपात कुणाला दाद मिळते हे तीन डिसेंबरलाच कळेल
कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर