Shinde vs Thackeray : सत्ता गमावण्यापासून चिन्ह गमावण्यापर्यंत, सत्तासंघर्षाची A to Z कहाणी
abp majha web team | 12 Oct 2022 07:46 AM (IST)

इथे महाराष्ट्रात सरकार कोसळलं होतं तर तिथे शिंदे गटाने गुवाहाटीतून गोवा गाठलं. मुंबईत येताच शिंदेंनी थेट सागर बंगला गाठला आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला. सत्तेसाठीचा तीन राज्यातला प्रवास ऐव्हाना संपला होता. आणि उत्सुकता निर्माण झाली कोण होणार मुख्यमंत्री याची. पुढचा घटनाक्रम कसा होता पाहूया.