Eknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसत्तास्थापनेचा तिढा असो किंवा पालकमंत्रिपदाचा वाद.. एकनाथ शिंदेंची नाराजी ही काही लपून राहिलेली नाही... मात्र एकनाथ शिंदेंनी नाराजी दूर करण्याऐवजी आता त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजप जनता दरबार भरवणार आहेत.. आणि ही जबाबदारी खांद्यावर घेतली आहे गणेश नाईकांनी... एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं डरकाळी फोडायला सुरूवात केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद कसे उमटू लागलेत.. पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट
राज्याच्या वनखात्याची आणि पालकमंत्री म्हणून पालघरची जबाबदारी यांच्या खांद्यावर आहे..
पण गणेश नाईकांना जास्त इंट्रेस्ट आहे तो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाण्यात...
ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला
मात्र ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या क्षमतेवर गणेश नाईकांचा विश्वास नाहीय का?
आणि जर असेल तर मग गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार का घेणार आहेत...?