Eknath Shinde Special Report : मंगलप्रभात लोढांच्या शिवरायांवरील वक्तव्यानंतर राजकारण पेटलं
abp majha web team | 30 Nov 2022 09:30 PM (IST)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यांचा वाद अजूनही शमलेला नाही. त्यात पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती शिवरायांशी तुलना करून नवा वाद ओढवून घेतला आहे. शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं प्रतापगडाच्या पायथ्याशी आयोजित कार्यक्रमात बोलताना लोढांनी हे वादग्रस्त विधान केलं.