Eknath Shinde Special :शिंदेंनी कमावलं, आमदारांनी गमावलं?बांगर ते सत्तार शिंदे गटाचे वादग्रस्त नेते
abp majha web team | 08 Nov 2022 10:04 PM (IST)

राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार येऊन चार महिने झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सरकारची प्रतिमा सुधारावी यासाठी एकनाथ शिंदे मेहनत घेत आहेत. अनेक वेळा तब्बल 18 तास एकनाथ शिंदे यांना काम करताना महाराष्ट्राने बघितलं. परंतु शिंदे जे कमवत आहेत ते त्यांचे सहकारी आमदार आणि मंत्री गमावतात का? असा प्रश्न पडतोय कारण शिंदे गटातील सहकाऱ्यांची एकापाठोपाठ एक वादाची प्रकरणं समोर येत आहेत.