Maharashtra Cabinet Special Report : महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा गुजरात पॅटर्न? कुणाला मिळणार संधी?

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्यातला रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) काही मुहूर्त मिळत नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. कारण उद्या होणारा मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर राज्य मंत्री मंडळ विस्ताराबाबत निर्णय अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज आपापले दिवसभरातले प्रशासकीय कार्यक्रम रद्द केले. उपमुख्यमंत्र्यांनी आजचे कार्यक्रम तातडीनं रद्द करत दिल्लीला गेले त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार उद्याच होणार असल्याची माहिती समोर आली होती. भाजपचे 8 तर शिंदे गटामधील सात जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी देखील माहिती समोर आली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायलयातील सुनावणीनंतर विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.