✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Eknath Shinde Maval Special Report : दोन महिन्यात फाशी, शिंदेंनी उल्लेख केलेलं मावळ प्रकरण काय?

abp majha web team   |  22 Aug 2024 11:29 PM (IST)

मुंबई : बदलापूरच्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यावरुन, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचंही पाहायला मिळत आहे. कारण, विरोधकांकडून या घटनेचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत, तर राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, लाडकी बहीण योजना नको तर सुरक्षीत बहीण योजनेची महाराष्ट्राला गरज असल्याचं विरोधक म्हणत आहेत. मात्र, सरकार आरोपीला कायद्यानुसार कडक शासन करेल, बदलापूर प्रकरणातही योग्य ती कारवाई सुरू असून विशेष एसआयटी नेमण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात एका खटल्याचा संदर्भ देत, 2 वर्षात आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याचं म्हटलं होतं. आता, त्या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले असून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 


काँग्रेसमधून शिवसेनेत (Shivsena) दाखल झालेले खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री शिंदेंनी Eknath Shinde) उल्लेख केलेल्या घटनेचा संपूर्ण तपशीलच सादर केला आहे. तसेच, ही घटना नेमकं कधी घडली, त्यात कधी चार्जशीट दाखल झालं आणि न्यायालयात (Court) कधी शिक्षा सुनावण्यात आली, याची इतंभू माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणात उल्लेख केलेली घटना ही 2 ऑगस्ट 2022 रोजीची असून मावळ येथील बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्याचा हा विषय आहे. याप्रकरणी, मावळ पोलिसांनी एफआयआर दाखल करुन जलद गतीने तपास केला होता. 


ती घटना पुण्यातील मावळची


पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील साडेसहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण, तसेच लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. याप्रकरणी, आरोपी तरुणाला पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. तपासामध्ये आरोपी तेजस दळवीच्या आईचा सुद्धा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे समोर आले होते. मुलांने केलेल्या कृत्यानंतर गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी आईनेच मदत केल्याचे तपासामध्ये समोर आले होते. त्यामुळे तिला सुद्धा सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 23 मार्च 2024 रोजी याप्रकरणात पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. खासदार मिलिंद देवरा यांनी याच घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्र्‍यांनी आपल्या भाषणात सांगितलेल्या घटनेत 2 वर्षांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचं म्हटलं आहे. 


काय आहे घटनाक्रम


दरम्यान, याप्रकरणात गुन्हा 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती, गुन्हा देखील त्याच दिवशी दाखल झाला होता. तर, आरोपीला 3 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी 12 सप्टेंबर 2022 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. या घटनेते 40 दिवसांत तपास पूर्ण करण्यात आला होता. चार्जशीट दाखल केल्यानंतर 6 महिन्यात चार्ज फ्रेम करण्यात आले. 16 मार्च 2023 रोजी चार्जशीट फ्रेम केले आणि 12 मे 2023 रोजी पुरावे कोर्टात सादर करण्यात आले होते. त्यानंतर, 22 मार्च 2024 रोजी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणात चार्जशीट दाखल केल्यानंतर 15 महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदेंनी कालच्या भाषणात उल्लेख केलली घटना हीच असल्याचं खासदार मिलिंद देवरा यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे. तसेच, बदलापूर प्रकरणातही मुख्यमंत्री स्वत: लक्ष देऊन आहेत, असेही देवरा यांनी म्हटलं आहे.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी 2 महिने असा उल्लेख केला, पण 2 वर्षाच्या आता इथं आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Eknath Shinde Maval Special Report : दोन महिन्यात फाशी, शिंदेंनी उल्लेख केलेलं मावळ प्रकरण काय?

TRENDING VIDEOS

Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report23 Minutes ago

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?31 Minutes ago

NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report40 Minutes ago

Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?41 Minutes ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.