Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report

महाराष्ट्रात सध्या ट्रिपल इंजिन सरकार असून भाजपच्या हाती सध्या मुख्यमंत्रीपदाचं स्टिअरिंग आहे. मात्र हे स्टिअरिंग पुन्हा हाती घेण्याची जाहीर इच्छा शिवसेनेनं व्यक्त केलीय. मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्याचं निमित्त साधत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीर व्यासपीठावरून व्यक्त केली. आपली इच्छा का योग्य आहे, हे सांगणारे अनेक दाखलेही नेत्यांनी दिलेत. एकीकडं विधान परिषद निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष चव्हाट्यावर आला असताना शिवसेनेच्या नेत्यांची ही भाषा नेमकं काय सांगते, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागलाय. याच प्रश्नाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात लवकरच काही फेरबदल होण्याचे संकेत मिळतायत.
त्यापूर्वी आपल्याला पद मिळावं किंवा असलेलं पद टिकावं, यासाठी शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रयत्न होत असल्याचा मुद्दाही राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.
राजकारणात कुठलंही वक्तव्य अपघाताने होत नाही, असं म्हटलं जातं.
पण या वक्तव्यामुळे आता महायुतीत काही अपघात होणार..
की राजकीय संघर्षाचे हे स्पीड ब्रेकर ओलांडून ट्रिपल इंजिनाच्या गाडीचा पुढचा प्रवास सुरळीत होणार, हे लवकरच कळेल.