BMC Election Special Report : मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याभोवती ईडीचा फेरा
abp majha web team | 16 Jan 2023 11:38 PM (IST)
कोरोना काळातल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची ईडीकडून आज साडेचार तास चौकशी करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटरमधल्या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ईडीनं चहल यांना तीन दिवसांपूर्वी नोटीस पाठवली होती. त्यानुसार त्यांनी मुंबईतल्या ईडी कार्यालयात हजेरी लावली. महाविकास आघाडीच्या काळात आयुक्त चहल हे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले दात. त्यामुळं चहल यांच्या मागे चौकशीचा फेरा लागण्याचं नेमकं कारण काय आहे आणि त्यामधून कुणाच्या अडचणी वाढू शकतात? याविषयी जाणून घेऊयात एबीपी माझाच्या रिपोर्टमधून.