Jalna : जालना लाचखोर डीवायएसपी आणि पोलीस निरीक्षकाचा प्रताप, भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण
रवी मुंडे, राहुल कुलकर्णी, एबीपी माझा | 27 May 2021 10:58 PM (IST)
जालन्यात लाचखोरीत अडकलेल्या डीवायएसपी आणि एका पोलीस निरीक्षकाकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण झालीय. या मारहानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वी अट्रोसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून 2 लाखांची लाच घेणारे निलंबित डीवायएसपी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना मारहाण करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.