Durga Bhosale Passed Away Special Report : युवा सेनेची 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड ABP Majha
abp majha web team | 06 Apr 2023 11:09 PM (IST)
काळ कधी कुणावर येईल काही सांगता येत नाही. आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेची सक्रिय सचिव दुर्गा भोसले-शिंदेचं बघा ना. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली कालच्या जनप्रक्षोभ मोर्चात सहभागी झालेली दुर्गा भोसले आज या जगात नाही, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण दुर्गा भोसलेचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय, हे कटू वास्तव ठाकरे कुटुंब आणि त्यांच्या शिवसैनिकांना आज पचवावं लागतंय. कालचा जनप्रक्षोभ मोर्चाची लढाई ही दुर्गा भोसले राजकीय जीवनातली अखेरची लढाई ठरली. तिनं इहलोकाचा घेतलेला निरोप हा अनेकांच्या मनाला चटका लावून गेला.