हवामान खात्याचा चुकीचा अंदाज, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, पावसाअभावी मराठवाड्यात पेरणी खोळंबली
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद | 23 Jun 2021 09:20 PM (IST)

कृषी विभागाने अनेकदा आवाहन करूनही शेतकरी कृषी विभागाच्या अवाहणाकडे दुर्लक्ष करतात. कृषी विभागाने अनेकदा आवाहन केलं होतं की 80 ते 90 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. जिल्ह्यात सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यात 20 टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या पण हवामान खात्याचा अंदाज चुकला अन् गेल्या आठवडाभरापासून पावसाने दांडी मारली. आता अनेक शेतकऱ्यांना आपले पीक वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.