Gas Cylinder : महागाईमुळे सिलेंडर 'शोभेची वस्तू', बुलडाण्यात रिकाम्या सिलेंडरचा असाही वापर
एबीपी माझा वेब टीम | 10 Jul 2021 08:44 PM (IST)

निरंतर वाढणाऱ्या घरगुती गॅसच्या किंमतीमुळे आता नागरिक मेटाकुटीला आले आहेत. ग्रामीण भागात तर अनेकांना आता घरगुती वापराचा गॅस आवाक्याच्या बाहेर असल्याने अनेकांनी आता चुलीवर जेवण बनवणेच पसंत केलं आहे. मात्र घरात गॅस सिलिंडर असूनही त्याचा फायदा नसल्याने आता सिलिंडर हे शोभेची वस्तू बनले आहे. मग काय त्याचा विविध उपयोगही सुरू आहेत.