✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report

abp majha web team  |  16 Mar 2026 10:42 PM (IST)
ABP News

Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


अखातात युद्धाचा भडका उडाला असताना देशात गॅस टंचाईचा भडका उडालाय. जागोजागी सिलेंडरसाठी रांगा हॉटेलची बंद शटर असं चित्र शहरा शहरात दिसू लागलंय. त्याचवेळी विरोधकही आक्रमक होताना दिसतायत. इरान युद्ध थांबण्याची चिन्ह नसताना आपल्याला आपल्या भुकेशी युद्ध करावं लागणार की काय अशी चिंता सध्या सर्वसामान्यांना कशी सतावते आहे याचा आढावा घेणारा पुढचा स्पेशल रिपोर्ट. अखाती युद्धामुळे देशभर निर्माण झालेल्या गॅस टंचाईची झळ आता सर्वसामान्यांच्या लाडक्या वडापाव ला बसू लागली आहे. पुण्याचा गार्डन वडापाव किंवा वडेवाले जोशी की कर्जतचा फेमस वडा गॅस मिळत नसल्यामुळे ही दुकान बंद झाली आहेत. गोंदिया नागपुरात गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे चुली पेटवायची वेळ हॉटेल आणणार आली आहे. कुठे भर उन्हात गॅस सिलेंडरसाठी सर्वसामान्यांना रांगा लावाव्या लागतात तर कुठे गॅस एजन्सीच्या कार्यालयात सिलेंडर मिळत नसल्यामुळे हमरी-तुमरी होती आहे. यावरून काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू केलंय. राज्यातही काँग्रेसने अनेक शहरांमध्ये निदर्शन सुरूच ठेवली असताना गॅसचा तुटवडा नसल्याचं सांगत काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करत असल्याचा पलटवार काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलाय. कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाही. वारंवार सांगितलं जात आहे की गॅसची कमतरता नाही. जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी लोकांमध्ये भीती तयार करतायत आणि त्या भीती पोटी लोक रांगा लावतायत. कोणीही रांगा लावायची आवश्यकता नाहीये. आवश्यक तेवढा गॅसचा पुरवठा आपल्याकडे आहे. गॅस सिलेंडरच्या याच्यामध्ये सरकारने वास्तविकता जनतेसमोर मांडली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात आज उद्योग बंद व्हायला लागलेत. हॉटेल बंद व्हायला लागलेत. मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला खोटं बोलून ज्या पद्धतीनं आमच्याकडे कुठलाही तुटवडा नाही असं सांगून जनतेची दिशाभूल करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत हे मी म्हणेन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्र आणि राज्य सरकार योग्य माहिती देत नसल्याचा आरोप केलाय. तर सुळे यांच्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असावी असं म्हणत गॅसचा तुटवडा नसल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलाय. दुर्दैव एका गोष्टीचं आहे की भारत सरकार आणि राज्य सरकार ही कबूलच करायला तयार नाहीये की तुटवडा आहे. म्हणजे ह्या ही जी महत्त्वाची माहिती आहे ही का सरकारला पोहचते का सरकार वास्तवापासून का दूर आहे हे मला समजत नाही. आणि भारतातल्या नागरिकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की वास्तव काय आहे जर कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागूया. सुप्रिया सुळेच्या बोलण्यामध्ये आणि आम्ही जे बोललो ते त्यांच्या ऐकण्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी अ गॅप मला दिसते आहे. केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही. घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत. अखातातून आलेलं शिवालीक हे जहाज सोमवारी गुजरातच्या मुंद्रा बंदराला लागलं. यावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. आधी गुजरातची गरज भागवली जाईल आणि मग बाकीच्या राज्यांना गॅस मिळेल हा राऊत यांचा दावा गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी फेटाळून लावला. आधी गुजरातला पुरेसं तेल उतरवलं जाईल. गॅस उतरवला जाईल. पुढल्या दोन महिन्यासाठी देश मेला तरी चालेल. देशाची जनता रांगेत उभी राहू द्या. पण मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत. अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री आहेत. बाकीचा देश जो आहे हा विरोधकांचा छळ करण्यासाठी आहे. जो काही सध्याला आदेश दिला गेलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे हा संपूर्ण देशाला दिला गेलेला आहे. कुठल्या राज्यामध्ये दुजाभाव हा केलेला नाही माझ्या तरी दुजाभाव असं आलेलं नाही तर संजय राऊतांना प्रत्येक गोष्टीवरनं त्यांना राजकारण करण्याची त्यांची सवय आहे तर त्याबद्दल मी काय बोलणार नाही. एकीकडे विरोधक सरकारवर दबाव वाढवत असताना अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत निवेदन दिलं. एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काळा बाजार रोखण्यासाठी केलेले उपाय यांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी एसपी आणि बाकीचे अधिकारी यांच्या कमिट्या नेमल्या. आणि त्यातून जे आहे आतापर्यंत अ 2129 आम्ही चौकशी केल्या. गॅस सिलेंडर जप्त केले 1208 33,000 33,000,000 66,411 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दाखल गुन्हे ते 23 केले आणि अटक व्यक्ती जे आहेत ह्या 18 आम्ही केलेल्या आहेत. मात्र या उत्तराने विरोधकांचं समाधान झालेलं नाही. सरकार टंचाई नसल्याचं सांगत असेल तर मग गॅससाठी रांगा का लागतायत असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. रांगा का दिसतायत लोक रस्त्यावरती का दिसतायत मी तर आपल्याच माध्यमातून मला माहिती मिळाली की मुंबईतली फक्त मुंबईतलीच मला वाटतं 30-40% रेस्टॉरंट्स आता बंद झालेली आहेत किंवा होतायत. जो जनतेचं दुःख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणून सुद्धा त्या तशा नाहीच आहेत असं मानणारा मुख्यमंत्री जर का आपल्या राज्याला लाभला असेल तर कठीण आहे राज्य. गॅस सिलेंडरची टंचाई नाही असं सरकारकडून सांगितलं जातंय तर रस्त्या रस्त्यांवर दिसणाऱ्या रांगा बंद पडलेली हॉटेल काही वेगळं सांगतायत. इरानमधलं युद्ध लांबण्याची शक्यता वाढली असताना इंधनाचं हे संकट अधिक गहिरं होत जाणार आहे. सरकारला साठेबाजी आणि काळा बाजार वेळीच रोखू गॅस पुरवठा जास्तीत जास्त सुरळीत करावाच लागेल अन्यथा आगामी काळात परिस्थिती आणखी चिघळत जाईल. विरोधक आरोप करत राहतील सत्ताधारी स्पष्टीकरण देत राहतील. ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.