Dombivli MIDC Chemical Blast : डोंबिवली स्फोटात किती बेपत्ता? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोंबिवलीतल्या अमुदान कंपनीतल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू झालाय... डोंबिवलीत ३ कंपन्यांमधून १२ कामगार बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आलीय... डोंबिवलीतल्या बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांना मात्र प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नाहीए... पोलिसांनीही आपल्याला हाकलून लावलं असा आरोप काही बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांनी केलाय.. पाहुयात एक रिपोर्ट
ठाणे : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटानंतर राज्य सरकारने या ठिकाणच्या कंपन्या पाताळगंगा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला आता पाताळगंगा गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. पाताळगंगा एमआयडीसी आणि निवासी परिसरामध्ये कोणताही बफर झोन शिल्लक राहिला नसून या ठिकाणी जर कंपन्या स्थलांतरित केल्या तर आंदोलन उभा करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. डोबिंवलीमध्ये झालेल्या स्फोटात आतापर्यंत 8 लोकांचा जीव गेला आणि अनेकजण जखमी झाले आहेत. त्याचसोबत या परिसरातील हजारो घरांचे नुकसान झाले. येथील एमआयडीसीला लागून नागरी वस्ती उभी राहिल्याने अखेर केमिकल कंपन्या पाताळगंगामध्ये स्थालांतरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.