Audi And Address Pune Special Report : 'ऑडी चालवणाऱ्यांना पत्ता विचारतात का?'
abp majha web team | 09 Jan 2023 09:21 PM (IST)
पुण्यातल्या दोन बातम्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत..काही गोष्टी अशा आहेत ज्या फक्त पुण्यातच घडू शकतात, अशाच दोन घटना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत... एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं असलं तर आपण त्या भागात पोहोचल्यावर नेमका पत्ता शोधतो. नसेल सापडत तर त्या भागात जो कोणी दिसेल त्यांना विचारतो... समोरच्याला पत्ता माहित असेल तर तो सांगतो नसेल माहित तर तसं सांगून पुढे जातो.... पण पुण्यात मात्र विचित्र प्रकार घडलाय. केवळ पत्ता विचारला म्हणून विशाल सोनवनेंवर हॉस्पिटल आणि पोलिस स्टेशन अश्या दोन्ही ठिकाणी जायची वेळ आलीये