मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे-संभाजीराजेंमध्ये चर्चा, उदयनराजेंचा राज्य सरकारवर निशाणा
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2021 11:07 PM (IST)

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंची पुण्यात भेट झाली. मराठा आरक्षणावर आमच्यात एकमत असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी भेटीनंतर दिली. तर मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याची असल्याचं उदयनराजे म्हणाले. पुण्यातील व्यावसायिक संदीप पटेल यांच्या घरात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांसमोर मराठा आरक्षणाबाबत आपापली भूमिका मांडली.