Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

जंतर मंतरचं जेन झी आंदोलन आणि विरोधकांनी संसदेचं कामकाज रोखून धरल्यानं धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रीपद सोडावं लागलं... राजीनाम्यानंतर ते प्रथमच काल संसदभवनात आले, तेव्हा त्यांचं शाल घालून स्वागत करण्यात आलं... तर आज भूवनेश्वर विमानतळावर एखाद्या विजेत्याच्या थाटात प्रधानांचं स्वागत झालं... यावरून विरोधकांनी टीका केली असली तरी यातून भाजप काही संकेत देऊ पाहतोय का, बघुयात हा स्पेशल रिपोर्ट...
सोमवारी धर्मेंद्र प्रधान संसदभवनात आपल्या गाडीतून उतरले अन् त्यांचं असं स्वागत झालं...
त्यानंतर मंगळवारी भुवनेश्वर विमानतळावरही प्रधान यांच्या स्वागताला शेकडो लोक जमा झाले...
एखादं पद गमावल्यानंतर असा सत्कारसोहळा क्वचितच कुणाच्या वाट्याला येत असेल...
प्रधानांचा राजीनामा घेतलाय तो केवळ विरोधक आणि आंदोलकांच्या दबावामुळे...
हा संदेश आपल्या कृतीतून देण्याचा भाजपचा प्रयत्न या जंगी स्वागत समारंभांमधून दिसतोय...
मात्र यावरून प्रधान आणि केंद्र सरकारला विरोधकांनी लक्ष्य केलंय...