Dhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special Report

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस झाले...
आणि या ५० दिवसांत विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे...
या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडसोबतच्या संबंधावरून धनंजय मुंडेवर राजीनाम्यासाठी राजकीय आणि सामाजिक दबाव वाढलेला आहे.
एकाकी पडलेल्या मुंडेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे..? त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्लीत होणार की मुंबईत.. ते स्वत: राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार.. येत्या काळात बीडचं राजकारण नेमकं कोणत्या वळणावर जाणार ? पाहुयात याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट.
दिल्लीमध्ये काय झालं?
- धनंजय मुंडे-प्रल्हाद जोशी यांच्यात ३० मिनिटे बैठक झाली.
- प्रल्हाद जोशी केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्री आहेत, मस्साजोगमुळे चर्चेत आलेली आवादा कंपनीही याच क्षेत्रात काम करते
- प्रल्हाद जोशी कर्नाटक भाजपमध्ये असताना गोपीनाथ मुंडे होते कर्नाटक प्रभारी
- भाजपमधील जुन्या संबंधांचा वापर करून राजीनाम्याची टांगती तलवार टाळण्याचा मुंडे यांचा प्रयत्न असल्याची चर्चा