Devendra Fadnavis on MLA's Security | आमदारांची सुरक्षा घटली, कुणाकुणाची सटकली? Special Report

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री फडणवीसांकडे असलेल्या गृहविभागाच्या एका निर्णयानं सध्या अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. याच शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्याचं झालं असं की अपुऱ्या पोलीस बळामुळे अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. यात माजी मंत्री आणि आजी-माजी आमदारांचा समावेश आहे. पण ही सुरक्षा कपात शिंदेंच्या आमदारांना रुचलेली नाही अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...
राज्यातील नेतेमंडळींच्या सुरक्षेत कपात
अपुऱ्या पोलीसबळामुळे गृहखात्याचा निर्णय
गृहखात्याच्या निर्णयामुळे शिंदे नाराज?
((नेत्यांच्या सिक्युरिटीचे व्हीज))
राज्याच्या गृहखात्यानं लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेत
कपात करण्याचा मोठा निर्णय घेतलाय...
पण गृहखात्याच्या या निर्णयावरुन महायुतीतच
संघर्षाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे
कारण सुरक्षेत कपात करण्यात आलेले सर्वाधिक आमदार हे शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत...
व्हीआयपींच्या सुरक्षेत नेमके कोणते बदल करण्यात आलेयत
त्यावरही एक नजर टाकूयात
((ग्राफिक्स इन))
व्हीआयपी सुरक्षेतील बदल - हेडर
----------------------------------------------
सर्वपक्षीय माजी आमदार,
आणि माजी खासदारांची
सुरक्षा काढण्यात आली आहे
--------
सर्वपक्षीय विद्यमान
आमदारांची वाय प्लस
सुरक्षा काढून केवळ
एक कॉन्स्टेबल देण्यात आलाय
--------
माजी नगरसेवक, माजी
पदाधिकारी यांचीही
सुरक्षा कमी करण्यात आली आहे
--------
तर मुख्यमंत्री, दोन्ही
उपमुख्यमंत्र्यांची
झेड प्लस सुरक्षा कायम आहे
--------
शरद पवार, उद्धव ठाकरे
यांची झेड प्लस
सुरक्षा कायम आहे
--------
तर राज ठाकरे, सुप्रिया सुळे,
आदित्य ठाकरे, श्रीकांत शिंदे
यांची वाय प्लस सुरक्षा कायम
ठेवण्यात आली आहे
((ग्राफिक्स आऊट))
यात भाजप आणि राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असला तरी संतापाचा भडका मात्र शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांचा उडालाय...
कारण सुरक्षाकपातीचा सर्वाधिक फटका शिवसेनेच्या आमदारांनाच बसलाय...
त्यात
((ग्राफिक्स इन))
माजी मंत्री दीपक केसरकर
तानाजी सावंत
अब्दुल सत्तार
सुहास कांदे
अभिजीत अडसुळ
प्रकाश सुर्वे
((ग्राफिक्स आऊट))
यांच्यासह २० आमदारांचा समावेश आहे...
त्यामुळे शिंदेंचे आमदार नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे...
बाईट - भरत गोगावले, आमदार
बाईट - शहाजीबापू पाटील, आमदार
VO
या सुरक्षा कपातीवरून सुरू असलेल्या नाट्यावर संजय राऊतांनी त्यांच्या स्टाईलंन
हल्लाबोल केलाय...त्यांना नितेश राणेंनी त्याच भाषेत उत्तर दिलंय...
2WIN BYTE
बाईट - संजय राऊत, खासदार
((त्यांनी या राज्यात वाय झेड करून टाकली आहे हे वेड्यांचे सरकार आहे. हे मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयात गोंधळ आहे))
बाईट - नितेश राणे, मंत्री
((उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची सुरक्षा व्यनस्था वाढवली आहे त्यांची नाही काढली त्यांची काढली तर त्यांनी लोकं अंडे टमाटे मारतील))
VO
राज्यात पोलिसांची संख्या पुरेशी नाही...
पोलीस बळाच्या कमतरतेचा मुद्दा अनेकदा समोर आलाय...
त्यामुळे अनेक वेळा पोलिसांना १२ ते १४ तास ड्युटी करावी लागते
वेळप्रसंगी ते २४ तास ऑन ड्युटी असतात...
मात्र काही नेतेमंडळी आपल्या सभोवती पोलिसांचा गोतावळा असणं
ही रुबाबाची गोष्ट समजतात...
त्यामुळे गृह खात्याच्या या निर्णयाचं एकीकडे स्वागतही केलं जातंय...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.