फडणवीस-पुरोहित भेटीवर काँग्रेसची टीका, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीशी फडणवीसांचं हस्तांदोलन
abp majha web team | 17 Feb 2022 10:55 PM (IST)

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी एक व्हिडीओ ट्विट करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील यूएपीए कायद्याअंतर्गत आरोपी असलेल्या प्रसाद पुरोहित यांच्याबरोबर फडणवीस यांचा हा व्हिडीओ सावंत यांनी ट्विट केलाय. आणि यह रिश्ता क्या कहलाता है, अशा शब्दांत फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.