Devendra Fadnavis Gadchiroli Guardian Minister : गडचिरोलीचं पालकमंत्रिपद फडणवीसांकडे? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख, ती ओळख बदलण्याचा मानस देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवलाय.. त्यासाठी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच राहिल अशी आशाही त्यांनी बोलून दाखवलीय. या पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही इच्छा दर्शवली असल्याचं कळतंय.
पालकमंत्री कोणीही झालं तरी गडचिरोलीला अच्छे दिन येतील का? नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराने मागे पडलेला हा भाग नवी स्वप्न पाहातोय ती पूर्ण होतील का? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
गडचिरोली म्हणजे नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख
गडचिरोली म्हणजे मागास, अतिदुर्गम, अविकसित भाग अशीही ओळख
गडचिरोली म्हणजे शिक्षा म्हणून बदली करण्याची जागा अशीही ओळख..
मात्र आता ही ओळख हळुहळू बदलू लागली आहे..
नक्षलवाद बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे..
लोह खनिजावर आधारित मोठ मोठे प्रकल्प सुरु होतायत..
हजारो कोटींची गुंतवणूक येत आहे..
रोजगाराच्या संधी सुद्धा वाढणार आहेे..
अशा कात टाकू पाहणाऱ्या गडचिरोलीचं पालकमंत्रीपद चर्चेत आहे.. त्यावरुन रस्सीखेच सुद्धा सुरु असल्याचीही चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आपली भूमिका मांडलीय.
एकनाथ शिंदे, अजित दादांसोबत चर्चा करून पालकमंत्री ठरवू असं त्यांनी सांगितलं
एक काळ असा होता की गडचिरोलीचं पालकमंत्री व्हायला कोणी तयार नसायचं,
पण माजी गृहमंत्री आर आर आबांनी ही प्रथा मोडली आणि गडचिरोलीच्या विकासात मन लावून काम करुन दाखवलं. नंतर मविआ सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे पद चर्चेत आणलं. तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनीही पालकमंत्री म्हणून मेहनत घेतली. मात्र या सगळ्यावर खासदार संजय राऊत यांनी खास आपल्या शैलीत वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
नक्षली हिंसाचारामुळे इथे नवा प्रकल्प, गुंतवणूक, रोजगार, विकासकामं कठीण होतं आता
'सुरजागड इस्पात' मध्ये 10 हजार कोटींची गुंतवणूक येत आहे. सात हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती या प्रकल्पामुळे होणार आहे. गडचिरोली लवकरच स्टील उत्पादनाचे महत्वाचं केंद्र बनतंय.आतापर्यंत महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा अशी गडचिरोली ची ओळख होती, पण आता गडचिरोली शेवटचा नाहीतर पहिला जिल्हा असेल असा आशावाद फडणवीसांनी बोलून दाखवला आहे. पालकमंत्री कोणीही झालं तरी गडचिरोलीला अच्छे दिन येतील अशी आशा.