BEED : कोरोनाच्या सावटात नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवणं योग्य? सपनाचे ठुमके, महाराष्ट्रात राजकीय फटाके
गोविंद शेळके, एबीपी माझा | 08 Nov 2021 11:00 PM (IST)
हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीनं काल परळीत ठुमके लगावले. मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत स्नेहमिलन आणि फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याच कार्यक्रमात सपना चौधरीच्या डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं.
याआधीही परळीत 2018 मध्ये नाथ फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमातही सपना चौधरीला बोलावण्यात आलं होतं. त्यावेळीही धनंजय मुंडेंवर टीका झाली होती. सध्या कोरोनाचं सावट कायम असताना सर्वसामान्यांना सरकारकडून निर्बंध पाळण्याचं आवाहन केलं जातंय.अशा परिस्थितीत धनंजय मुंडेनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळं संताप व्यक्त होतोय.