डेल्टा प्लस विषाणू अतिधोकादायक! जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, नियम पाळा, तिसरी लाट अटळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jun 2021 10:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशनंतर आता देशाच्या इतर भागातही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना, विशेषत: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना खबरदारी घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.